Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजआता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय नाही; तर देसाईगंज उपजिल्हा रुग्णालय... - आमदार कृष्णा...

आता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय नाही; तर देसाईगंज उपजिल्हा रुग्णालय… – आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयाला विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिली.
शुक्रवारी याबाबत शासन निर्णय निर्गमीत झाल्याने देसाईगंज येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे.यामुळे अनेक गरजूंना वेळेत उपचार मिळण्यास लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या विशेष सहकार्याने आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांमुळे देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा काल, शुक्रवार दिनांक-४ ऑक्टोंबर २०२४ ला शासन निर्णय जारी केला आहे.
देसाईगंज येथील पूर्वीच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे.देसाईगंज शहरात बाहेर ठिकाणांहून खरेदी-विक्री करण्यास मोठ्या प्रमाणावर व्यापारी,नागरिक व इतर प्रवाशांची नेहमीच रेलचेल असते.अशातच एखादेवेळी मोठे अपघात घडल्यास वा परिसरातील इतर रुग्णांना तातडीचे वैद्यकीय उपचार सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढतच चालले होते.त्याचप्रमाणे अपघात ग्रस्तांना पाहिजे त्या प्रमाणात वेळेत उपचार मिळत नसल्याने रूग्णांना केव्हा-केव्हा मृत्यूशी झुंज देत मृत्युमुखी पडण्याची वेळ येत होती.उपजिल्हा रुग्णालयामुळे रुग्णांना वेळेत उपचार होऊन रेफर गळतीचे प्रमाण कमी होणार आहे.शासनाच्या या निर्णयानंतर देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार मानीत आनंद व्यक्त केला आणि शासनाचे सुध्दा आभार मानले आहे.
कृष्णा गजबे,आरमोरी विधानसभा क्षेत्र👇
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरास लेखी आदेशाने मान्यता दिली आहे.सर्व जनता-जनार्दन यांच्या आशीर्वादानेच कार्य झाल्याने,मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!