Tuesday, September 22, 2026
Homeमुंबईआता दहावी,बारावीच्या परीक्षार्थींना मोजावी लागणार अधिकची रक्कम…-परीक्षा शुल्कात झाली वाढ..

आता दहावी,बारावीच्या परीक्षार्थींना मोजावी लागणार अधिकची रक्कम…-परीक्षा शुल्कात झाली वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसांतच जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकालांपूर्वीच्या वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच २०२४-२५या शैक्षणिक वर्षादरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी तसेच बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.येणाऱ्या शैक्षणिक वर्षादरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी १२ टक्के शुल्कवाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क,प्रमाणपत्र शुल्क,प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागणार आहेत.छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे.राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० ते १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर १७ नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. १७ नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ४२० रुपयांवरून ४७० रुपये केले आहे.तर, १७ नंबरच्या फॉर्ममध्ये ३० रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात ११० रुपयांची वाढ केली आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले असून आता दहावी,बारावीच्या परीक्षार्थींना अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!