Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईआता ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सर्व योजना एका छताखाली..

आता ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सर्व योजना एका छताखाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली.१ कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण,छळ, पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण आणि त्यांना निवारा पुरविणे आणि विमा कवच देणे ही महामंडळाची उद्दिष्टे असतील.
राज्य मंत्रिमंडळाच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता.त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आता काढला आहे.महामंडळाचे मुख्यालय मुंबईत असेल.विद्यमान वा निवृत्त सनदी अधिकारी हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील.ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या
सर्व योजना एका छताखाली आणून … त्यांचा लाभ मिळवून देण्याचे काम हे महामंडळ करेल.ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये; यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल.सुरुवातीला महामंडळाचे भागभांडवल हे ५० कोटी रुपये असेल.वृद्धाश्रमांच्या संदर्भात एकात्मिक धोरण हे महामंडळ तयार करेल.
महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय आधीच घेतले आहेत.बीपीएलमधील ज्येष्ठ नागरिकांना तीन योजनांमध्ये पूर्वी मासिक
६०० रुपये दिले जात असत.आता १५०० रुपये मासिक दिले जातात.महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ६० वर्षे वयावरील सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमाकवच दिले आहे.या योजनेच्या राज्य जिल्हा संनियंत्रण समितीवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी हेल्पलाइन तयार केली जाईल.ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावाचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाईल.त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे.वैद्यकीय महाविद्यालये,संशोधन संस्था व बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या समस्यांसंबंधी अभ्यास केला जाईल.त्याआधारे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना व उपक्रम राबविले जातील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!