Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीआता गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे आवश्यक...

आता गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे,रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी)  बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे.यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्याकरिता मे.रियल मेझोन इंडिया लि. हि एजन्सी निश्चित करण्यात आलेली असुन एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकिंग पोर्टल http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे.वाहन धारकांनी त्वरीत पोर्टल बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहन धारक गडचिरोली जिल्ह्यातील नसला तरी काही कामा निमीत्त गडचिरोली जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. सदर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता पूढील प्रमाणे शुल्क जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे.वाहनाचा प्रकार दुचाकी/ट्रॅक्टर शुल्क/फिस ४५०,तीन चाकी शुल्क/फिस ५००,इतर सर्व वाहने शुल्क/फिस ७४५ वाहन धारकांना त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापूरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली येथे तक्रार दाखल करु शकतात. सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे.सबब वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे व तिसऱ्या नोंदणी चिन्हाचे स्टीकर लावण्याकरिता एचएसआरपी पोर्टलवर दिनांक-३१ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण,पत्ता बदल,वित्त योजना चढविणे/उतरविणे/दुय्यम प्रत/विमा अद्यावत करणे इत्यादि कामकाज थांबविण्यात येईल,तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सुचना प्राप्त झाल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!