Friday, May 1, 2026
Homeमुंबईआता ई-चलान भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांना मोठा दणका…-वाहनचालकांच्या बँक खात्याशी ई-चलान होणार...

आता ई-चलान भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांना मोठा दणका…-वाहनचालकांच्या बँक खात्याशी ई-चलान होणार लिंक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-वाहतुकीचे नियम मोडूनदेखील ई-चलान भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चालकांना मोठा दणका देण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागाने घेतला आहे.राज्यात ४ कोटी २८ लाख चालकांनी अद्याप २ हजार ४२९ कोटी रुपयांची ई-चलानची थकबाकी भरलेली नाही.यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला वाहनचालकांचे बँक खाते ई-चलानशी लिंक करण्याच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.

जानेवारी २०१९ पासून ई- चलान अस्तित्वात आले. वाहनचालकांना हँडहेल्ड डिव्हाईसेस आणि सीसीटीव्हीच्या आधारे वाहतूक पोलिसांकडून ई-चलानद्वारे वाहतूक उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात येतो.जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत ७ कोटी ५३ लाख ३६ हजार २२४ पेक्षा जास्त वाहनचालकांना राज्यात ई-चलानद्वारे ३ हजार ७६८ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.परंतु, वाहनचालकांनी मार्च २०२४ पर्यंत केवळ १ हजार ३३९ कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. अतिवेगाने वाहन चालविणे,लेन कटिंग आणि सिग्नल ओलांडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलान जारी होते.

ते वसूल करण्यासाठी वारंवार मोहिमा राबविल्या जातात.परंतु, तरीदेखील वाहनचालक दंड भरत नाहीत.त्यामुळे राज्य परिवहन विभागाने वाहनचालकांच्या बँक खात्याशी ई- चलान लिंक करण्याची भूमिका घेतली आहे.

फास्टॅग आणि वार्षिक मोटार विमा भरण्यासाठी जोडलेल्या बँक खात्याशी ई-चलान जोडण्यात येईल. जेव्हाही वाहनचालक त्याच्या फास्टॅगमध्ये रक्कम भरेल किंवा वाहनाचा विमा भरण्याचा प्रयत्न करेल तेव्हा थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येईल. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!