Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तझोपेत चालणाऱ्या सवयीने केला घात; सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू..

झोपेत चालणाऱ्या सवयीने केला घात; सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अनेकांना झोपेत चालायची सवय असते.मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे.मुंबईतील भायखळा येथे धक्कादायक घटना घडली आहे.एका १९ वर्षीय मुलाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.मुस्तफा इब्राहिम चुनावाला वय १९ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे.भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझगाव येथे टॉवर नंबर १,नेसबीट रोड येथे मुस्तफा राहत होता.त्याला झोपेत चालायची सवय होती.काल,३० जूनच्या मध्यरात्री तो झोपेतच सहाव्या मजल्यावर चालत गेला आणि खाली पडला.यात तो गंबीर जखमी झाला.त्याला तात्काळ उपचारासाठी तिथल्या सेफी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्याच्या मृत्यूने चुनावाला कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!