Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन…-क्रीडा स्पर्धेसाठी ४ जुलैपर्यंत अर्ज कण्याचे...

गडचिरोली जिल्हा स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन…-क्रीडा स्पर्धेसाठी ४ जुलैपर्यंत अर्ज कण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सुब्रोतो मुखर्जी कप जिल्हा स्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्यु. कॉलेज,सुंदरनगर ता.मुलचेरा जि.गडचिरोली येथे करण्यात येत आहे.सबज्युनिअर व ज्युनिअर संघानी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे.तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स,गडचिरोली येथे ऑफलाईन प्रवेश अर्ज दि.४ जुलै,२०२४ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता यावर्षी पासून पुढे १४ वर्षाखालील मुले (सबज्युनिअर) या ऐवजी १५ वर्षाआतील मुले या वयोगटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सबज्युनियर १५ वर्षे वयोगटातील मुलांकरीता दि.१ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.तसेच ज्युनिअर १७ वर्षाखालील मुले व मुली दि.१ जानेवारी २००८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्मदाखला, आधारकार्ड,खेळाडू ओळखपत्र,पासपोर्ट असणे अनिवार्य आहे.तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून,त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपुर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव,जन्मतारीख,वर्ग, आधार क्रमांक,शाळेचे नांव,पत्ता,शाळेचा युडायस क्रमांक,खेळाडू स्वाक्षरी,रजिस्टर नंबर,मोबाईल क्रमांक, lसंस्था प्रमुख/ मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा.१५ वर्षाआतील खेळाडूंकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.तरी संघाचा प्रवेश अर्ज विहीत मुदतीत कार्यालयात सादर करुन जास्तीत जास्त संघांनी/शाळांनी सहभागी व्हावे.प्रवेशिकेची एक प्रत स्पर्धास्थळी देणे व संघ वेळेवर स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवणे अनिवार्य आहे.स्पर्धेबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक (9503331133) यांना कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा; असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, भास्कर घटाळे यांनी केले.   

स्पर्धा आयोजन 👇

स्पर्धा आयोजन स्थळ :- नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा ज्यु.कॉलेज,सुंदरनगर ता.मुलचेरा

१५ वर्षे मुले व १७ वर्षे मुली : दि.५ व ६ जुलै २०२४

संघ उपस्थिती :- दि.५ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत

१७ वर्षे मुले : दि.६ व ७ जुलै २०२४

संघ उपस्थिती :- दि. ६ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत

संपर्क क्रमांक :- तालुका क्रीडा संयोजक,मुलचेरा (9420013435)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!