Monday, August 31, 2026
Homeगोंदियाआजपासून रेल्वे लाईनचे काम सुरू; तब्बल १४ गाड्या राहणार रद्द..

आजपासून रेल्वे लाईनचे काम सुरू; तब्बल १४ गाड्या राहणार रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील राजनांदगाव-कळमना रेल्वे मार्गावर तिसरी लाइनला तुमसर यार्डसह जोडण्याचे काम आज,शनिवार २४ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे.या विकास कामामुळे प्रवासी सुविधा सुधारेल.त्यातच,रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकही सुधारेल.मात्र,नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे आज २४ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान काही गाड्या रद्द राहणार आहेत.यामुळे सदरच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळासाठी मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • २४ ते ३१ जानेवारीदरम्यान खालील रेल्वे गाड्या राहणार रद्द👇
मेमू तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर (५८८१७),
तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर (५८८१६),
इतवारी-तिरोडी पॅसेंजर (५८८१५),
तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर (५८८१८),
बालाघाट-इतवारी-तिरोडी मेमू ६८७१५),
इतवारी-बळ्ळाघाट मेमू (६८७१४) रद्द राहील.
२८ ते ३१ जानेवारीला- दुर्ग-गोंदिया मेमू (६८७४१),गोंदिया-इतवारी मेमू (६८७४३)रद्द,
इतवारी-गोंदिया मेमू (६८७४४),गोंदिया-दुर्ग मेमू (६८७४२),डोंगरगढ-गोंदिया मेमू (६८७११),
गोंदिया-इतवारी मेमू(६८७१३),इतवारी-गोंदिया मेमू (६८७१६),गोंदिया-डोंगरगढ मेमू (६८७१२) रद्द राहील.
  • या गाड्या राहणार सुरू👇
२४ ते ३१ जानेवारीदरम्यान तुमसर रोड-तिरोडी डेमू (७८८११) गोबरवाहीपर्यंत, तिरोडी-तुमसर रोड डेमू (७८८१२) गोबरवाहीपर्यंत, तिरोडी-बालाघाट डेमू (७८८१३) गोबरवाहीहून सुरू राहील, बालाघाट-तिरोडी डेमू (७८८१४) गोबरवाहीपर्यंत.
  • या गाड्या धावणार उशिरा👇
२९ जानेवारी रोजी इतवारी-कोरबा शिवनाथ एक्स्प्रेस (१८२४०)इतवारी-तुमसर रोडदरम्यान ३० मिनिटे उशिरा,३१ जानेवारी रोजी अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस (१२८३३) ला इतवारी-गोंदियादरम्यान ४० मिनिटे उशिरा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!