- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-भारतीय प्रशासन सेवेच्या सन २०२३ च्या तुकडीतील सिध्दार्थ शुक्ला,(परिविक्षाधीन भारत प्रशासन सेवा) हे गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आज,सोमवार २० जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ (०४ आठवडे)या कालावधीत देसाईगंज तहसिलदार या पदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणार आहेत.तर सदरच्या कालावधीत देसाईगंज तहसिलदार पदावर कार्यरत असणाऱ्या प्रिती डुडुलकर ह्या अतिरिक्त तहसिलदार देसाईगंज म्हणून कार्यरत राहणार आहेत.
माहितीनुसार,देसाईगंज शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोऱ्या वाढीस लागून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्या जात असल्याचा प्रकार अप्पर मुख्य सचिव,महसूल व वन विभाग,मंत्रालय मुंबई यांच्या निदर्शनास आला असून यावर तात्काळ आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने ठोस पावले उचलली जाणार आहेत.त्यातच भ्रष्ट अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वटणीवर आणून कारवाईचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.त्यामुळे पुढील घंटा ही धोक्याचीच मानावी लागेल,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
- Advertisement -

