Tuesday, May 26, 2026
Homeदेसाईगंजआज देसाईगंजच्या सिंधी समाज बांधवांना निवासी पट्ट्यांचे वाटप..

आज देसाईगंजच्या सिंधी समाज बांधवांना निवासी पट्ट्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील सिंधी समाज बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी पट्ट्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आज,गुरुवार १ जानेवारी रोजी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शहरातील तब्बल २२ सिंधी बांधवांना निवासी पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
सिंधी समाज बांधव १९५२ पासून देसाईगंज शहरामध्ये विस्थापित झाले.अथक परिश्रम करुन हा समाज प्रगतशील झाला.मात्र,यांच्या निवासी पट्ट्यांचा प्रश्न अधांतरी राहिला.सिंधी समाजातील अनेक नेत्यांनी निवासी पट्ट्यांचा प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता.त्याचबरोबर,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे किसन नागदेवे,जेसा मोटवानी तसेच मोतीलाल कुकरेजा यांनी सातत्याने निवासी पट्ट्यांबाबत मागणी केली होती.त्यानुसार,गजबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर मागणीस यश आले व महसूल मंत्र्यांनी सिंधी समाजाला पट्टेवाटपाकरीता शासकिय शिबीर आयोजित करावे,असे निर्देश दिले होते.त्यानुसार, आज देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी शहरातील स्थानिक सिंधूभवन येथे शिबिर आयोजित करुन तब्बल २२ सिंधीबांधवांना निवासी पट्टे प्रदान केले व उर्वरित कुटुंबीयांना सुद्धा लवकरच निवासी पट्ट्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रधान यांनी स्पष्ट केले.
प्रसंगी सिंधी समाजातील ज्या मान्यवरांनी समाजातील लोकांना पट्टे मिळण्यास प्रयत्न केले,असे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी,नवनिर्वाचित नगरसेवक राहुल सतवानी,नगरसेविका खुशबु साधवानी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोषकुमार शामदासानी,पत्रकार प्रकाश जिवानी,दिलीप जिवानी,लक्ष्मण रामाणी,किशन शामदासानी,अनिल साधवानी,महेश सचदेव,शंकरलाल खत्री,खेमचंद लालवानी,मोहन डेंगानी,संतुमल डोडानी, राजकुमार मोटवानी,हरिदास मोटवानी,श्रीचंद डेंगानी यांचेसह बहुसंख्य सिंधी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण रामानी यांनी केले,तर आभार नगरसेवक राहुल सतवानी यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!