Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजआज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील एकल महिलांचा मेळावा संपन्न झाला.सदर मेळाव्यात एकल महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना,तसेच उमेद अभियानाअंतर्गत स्वयंसहायता समूहामध्ये समाविष्ट होऊन ग्राम संघामार्फत मिळणारा लाभ याबद्दल माहिती देण्यात आली.प्रसंगी मेळाव्यात उपस्थित एकल महिलांना एकल महिलांसाठी असणाऱ्या पशु संबंधीच्या योजनांची माहिती पशु व्यवस्थापक विनोद उरकुडे यांनी दिली.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डोंगरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रशासक
 छगन चव्हारे होते,तर या एकल मेळाव्याचे उद्घाटन गीता धानगुणे अध्यक्ष ग्रामसंघ,डोंगरगाव यांचे हस्ते,तर गीता प्रधान सचिव ग्राम संघ,उर्मिला बाविस्कर चिखली यांच्या प्रमुख उपस्थितीत,प्रभाग समन्वयक भूमेष ठीकरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.कार्यक्रमाचे संचालन नीलिमा खरकाटे यांनी केले,तर प्रास्ताविक कृषी व्यवस्थापक प्रशांत मंडपे यांनी केले.उपस्थितांचे आभार वंदना नंदेश्वर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली माटे, सरिता माटे,कविता खरकाटे,शाहिस्ता पठाण यांचेसह उमेदच्या महिलांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!