Saturday, June 20, 2026
Homeदेसाईगंजआज कुरूड येथे शंकरपटाचे आयोजन; ८ नाट्य प्रयोगांचा धडाका..!

आज कुरूड येथे शंकरपटाचे आयोजन; ८ नाट्य प्रयोगांचा धडाका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे आज,गुरुवार ६ फेब्रुवारीला शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने रात्रीच्या सुमारास गावातील विविध वार्डात ८ नाट्य प्रयोगांचा धडाका असणार आहे.आजचे युग तंत्र ज्ञानाचे युग जरी असले तरीही शंकरपटाची पूर्वीपासूनची चालत आलेली परंपरा आजही कायम असल्याचे चित्र देसाईगंज तालुक्याच्या कुरूड गावात दिसून येत आहे.पंचक्रोशितील लाखो रसिक नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेण्याकरीता कुरूड गावात दाखल होत असतात.यंदा गावातील विविध वार्डात ८ नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. आयोजित नाट्य प्रयोगांमध्ये संगीत पेटलेल्या चुली, कसे तोडू मी मंगळसूत्र,अंधारलेल्या वाटा,अंधारातील लाल दिवा, लाडका,सौदा सुहासिनीचा,आहुती, लावणीचा दुय्यम जंगी मुकाबला अश्या ८ नाट्य प्रयोगांचा समावेश आहे.विशेष म्हणजे दुकानदारांनी दुकाने थाटण्याकरीता काल बुधवार पासूनच जागेची शोधाशोध केली.अशातच आज सकाळपासून विविध दुकाने सजू लागली असल्याचे दिसून येत आहे.त्यातच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गावात मोठ्या प्रमाणावर रेलचेल सुरू झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!