Saturday, October 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली असून,आगामी काळात राज्यात धान्य, कडधान्ये आणि तेलबियांची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील ज्वारी,बाजरी,तांदूळ आणि मका या पिकांच्या उत्पादनात ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. सोयाबीन आणि भुईमुगाच्या उत्पादनातही सुमारे ६५ टक्के घट होण्याची शक्यता आहे.पावसाअभावी कोकण आणि पूर्व विदर्भातील आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील भातशेती प्रभावित झाली आहे. अश्यातच तूर,मूग आणि उडदाच्या उत्पादनातही ६५ टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे.या परिस्थितीमुळे यंदाच्या रब्बी हंगामात गहू,हरभरा आणि हिरव्या भाजीपाल्याच्या पेरणी क्षेत्रात ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.ऊस उत्पादनातही सुमारे २५ टक्के घट होण्याचा अंदाज असून,त्याचा परिणाम राज्यातील वखार उद्योगावर तसेच बाजारातील साखरेच्या उपलब्धतेवर होऊ शकतो.धान्य आणि अन्य खाद्यपदार्थांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास बाजारात महागाई झपाट्याने वाढू शकते.परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो.यासाठी सरकारने आतापासूनच अन्नधान्याच्या उपलब्धतेचे नियोजन करावे,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!