- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैध धंदे करणारे व रेती तस्करांशी हातमिळवणी करून सुमधुर संबंध असणाऱ्या चर्चित पोलीस जमादारास यावेळी चांगलेच महागात पडले असल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात उघडकीस आली आहे.मोहाडी तालुक्यातील करडी ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल (हवालदार) अर्पित भोयर यांची जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या आदेशावरून तडकाफडकी पोलिस मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भोयर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.दरम्यान,रेतीच्या ३ गाड्या सोडून देण्याचे प्रकरण त्यांना यावेळी चांगलेच महागात पडले.दोन वर्षाआधी अर्पित भोयर करडीत हेड कॉन्स्टेबल(हवालदार) म्हणून रूजू झाले.अवैध व्यावसायिक व रेती तस्करांशी साटेलोटे व मधूर संबंधामुळे ते चर्चेत होते.ऑगस्ट महिन्यात निलज (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीचे पिल्लू वाहनाच्या धडकेत ठार झाले होते.हवालदार भोयर यांना याबाबत सूचना देण्यात आली.त्यांनी तक्रार लिहून न घेता परस्पर वाहन चालकाशी बोलणी करून गुन्ह्याची नोंद केली नव्हती.भगवान चांदवार यांनी पाठपुरावा केल्याने ८ दिवसांनी गुन्ह्याची नोंद झाली.देव्हाडा येथील एका रेती चोराशी मोबाइलवर संभाषण करताना ‘मी तुझे ३ ट्रॅक्टर सोडून दिले’, असे म्हणने यावेळी भोयर यांना चांगलेच महागात पडले.सदर प्रकरण पोलिस अधीक्षकांच्या कानावर जाताच त्यांनी तातडीने दखल घेत मुख्यालयी रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
- Advertisement -

