Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीअभिनयाची छाप पाडत झिलबोडीच्या नाट्य कलावंताने गाजवली झाडीपट्टी नाट्यरंगभूमी.. - केशव लोखंडे...

अभिनयाची छाप पाडत झिलबोडीच्या नाट्य कलावंताने गाजवली झाडीपट्टी नाट्यरंगभूमी.. – केशव लोखंडे यांचा गावातील हौशी नाटकापासून ते व्यवसायीक नाटकापर्यंतचा अतुलनीय प्रवास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-चंद्रपुर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ३०० लोकसंख्येची वस्ती असलेल्या झिलबोडी या छोट्याश्या गावखेड्यातील रहिवासी असलेले केशव नानाजी लोखंडे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडत काही कालावधीतच झाडीपट्टीची अख्खी नाट्यरंगभूमी गाजवली आहे.लोखंडे यांनी १४ एप्रिल १९८९ ला ‘रक्ताची तहाण’ या नाटकापासुन सुरूवात करून आतापर्यंत विविध नाटकांत काम केले आहे. ‘रक्ताची तहाण’ या नाटकातील अभिनयाने रसिकजण भारावून गेले होते.नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून गाडीने जो रुळ पकडला,तो रुळावरून धावलेल्या गाडीला आजपर्यंत कुठेच थांबा मिळालेला नाही.केशव लोखंडे हे झाडीपट्टी रंगभूमीचे दिग्दर्शक तथा विनोदी नटसम्राट म्हणून प्रसिध्द आहेत.मधुरवाणी व मनमिळावू स्वभावामुळे ते चाहत्यांच्या दिलावर राज करू लागलेत.संगीत व्यथा एका जवानाची,घुंगरू,संभा वेलदार,गरीबाचा कैवारी-गरीबाचा रक्तपीता,रक्ताची तहान,पुढाऱ्याची ऐसी तैसी,सौभाग्यदान,आकित, नकोशी,औकात,वनवा पेटला क्रांतीचा,कां दिलं जन्म मला,असुनी नाथ मी अनाथ,ग्रहन लागलं घरट्याला, खबरदार मामाजी, आघात,महानाट्य मी योध्दा भिमा कोरेगावचा,रूसला पदर मायेचा अशा चंद्रपुर,भंडारा, गोंदिया,गडचिरोली व नागपुर जिल्ह्यात झालेल्या नाटकांत अभियाची छाप पाडून सकल झाडीपट्टी रंगभूमी गाजवली.नाट्यकलावंत ते दिग्दर्शकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन,व्यसनमुक्ती, पथनाट्य, कला पथक तसेच विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून सामाजिक कार्यासह मनोरंजनात्मक कार्य करीत आहेत.केशव लोखंडे यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले असून नाटकांसह ते गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा)पंचायत समितीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!