Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता सार्वजनिक गणेश उत्सव 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून घोषित..

आता सार्वजनिक गणेश उत्सव ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात सामाजिक ऐक्य,राष्ट्रीय, स्वतंत्रता,स्वाभिमान व स्वभाषेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राचा गणेशोत्सव १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला.परंपरेनुसार आजही देशभरात मोठ्या भक्तिभावाने तितक्याच उत्साहात सार्वजनिक गणेश उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आहे.त्यामुळे भाजपाचे कसबा पेठ येथील आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा,अशी मागणी विधानसभेत केली.त्यानुसार लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या व मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून आज,गुरुवार १० जुलै रोजी विधानसभेत घोषित करण्यात आले.सदरची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार यांनी केली.घोषणा करतांना मंत्री शेलार म्हणाले की,देशात नाहीतर जगात गणेशोत्सवाची व्याप्ती,संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध असणार आहे. पण,काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे  बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशातच सगळ्या निर्बंधांना, आलेल्या स्पिड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम महायुती सरकारने अतिशय शीघ्रतेने केले आहे.महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला आपला गणेशोत्सव आहे.त्यामुळे  सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून आजच घोषित करण्यात येत असल्याचे शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!