Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् तुरुंगातूनच अरविंद केजरीवाल ने दिला पहिला आदेश….

अन् तुरुंगातूनच अरविंद केजरीवाल ने दिला पहिला आदेश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते.परंतु,अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांना गेल्या आठवड्यात अटक केली.या अटकेविरोधात आणि रिमांडवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु, न्यायालयाकडून केजरीवाल यांना याप्रकरणात दिलासा मिळालेला नाही.उलट या अटकेविरोधात उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने ईडीला २ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.न्यायालय येत्या ३ एप्रिल रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी करेल.२१ मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानातून अटक केली होती.त्यानंतर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविले.ईडीच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवरून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी ईडीला नोटीस बजावली असून त्यांच्याकडे या अटकेप्रकरणी उत्तर मागितले आहे.न्यायालयाने ईडीला २ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.केजरीवाल यांच्या वकिलांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची तात्काळ तुरुंगातून सुटका व्हावी; यासाठी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.परंतु, ईडीने तातडीने सुनावणी घेण्यास विरोध केला.तसेच केजरीवाल यांच्या अटकेबाबत उत्तर देण्यास वेळ मागितला.त्यावर न्यायालयाने ईडीला २ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारचा गाडा कोण हाकणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर आम आदमी पार्टीने केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील असे उत्तर दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरूवात केली आहे.दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित पहिला आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला.दिल्लीत काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून त्या ठिकाणी पाण्याचे टँकर वाढवण्यासंदर्भात केजरीवाल यांनी सूचना दिल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!