Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील कवी गाजला आंतरराष्ट्रीय स्तरावर…-६०० हुन अधिक कवितांचा होता समावेश…-मुलचेरा तालुक्यातील...

गडचिरोली जिल्ह्यातील कवी गाजला आंतरराष्ट्रीय स्तरावर…-६०० हुन अधिक कवितांचा होता समावेश…-मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथील युवक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- कवी विजय वडवेराव आयोजित आंतर राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली.सदर कवितेचा विषय “व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची” असे होते.महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ ला पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.अशा स्त्री शिक्षणाच्या उगमस्थानाची, बहुजनाच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळाची,जनजागृती करण्याकरिता या भव्य आणि दिव्य स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, गोवा,केरळ,सिलवासा या राज्यातील तसेच भारताबाहेरील; अमेरिका,लंडन,ऑस्ट्रेलिया,स्वीडन, दुबई,बुधाबी या देशातील कवींनी आपली कविता पाठवून सहभाग घेतला होता.६०० हुन अधिक कवितांचा समावेश असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या खेडेगावचे युवा कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून आपल्या गावचे तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.सदर कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक- ३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह टिळक रोड पुणे येथे संपन्न होणार आहे.सदर वितरण सोहळ्यात दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ,पुस्तक व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या होणाऱ्या सत्काराबद्दल त्यांचे नातेवाईक,मित्रपरिवार,साहित्यिक सहकारी,गावकरी मंडळी या सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!