Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरअतिविषारी सापाचा दंश; महिलेचा मृत्यू..

अतिविषारी सापाचा दंश; महिलेचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पहाटेच्या सुमारास घरगुती कामे करीत असतांना अतिविषारी सापाने हाताला दंश केल्याने एका २९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे घडली.श्वेता संदीप श्रीरामे वय २९ वर्षे, हल्ली रा.खडसंगी,(मूळ रा.घोडाझरी) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
श्वेता श्रीरामे ह्या आज रविवारच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घरगुती कामे करीत असतांनाच गवाऱ्या नाग जातीच्या अतिविषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. घटना उघडकीस येताच श्वेता त्यांना तात्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.दरम्यान,नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.घटनेमुळे श्रीरामे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!