Friday, October 9, 2026
Homeकुरखेडाअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार.. - कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी जवळील घटना..

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार.. – कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी जवळील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना काल,शनिवार १४ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी गावाजवळ घडली.हिवराज पुरुषोत्तम मारगाये वय ३१ वर्षे रा.गोठणगांव, ता.कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मृतक हिवराज हा काही कामानिमित्त अंतरगाव येथे मामाच्या घरी गेला होता. काल शनिवारी सांयकाळी तो स्वतःच्या दुचाकी क्रमांक-एम एच ३३ ए ई-७९९० ने गोठणगांव येथे परत येत असतांना लेंढारी गावाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली.यावेळी तो बराच काळ रस्त्यावरच बेशुध्द होऊन पडलेला होता.अशातच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सदर अपघात निदर्शनास येताच,कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेला सूचना दिली.त्यानंतर हिवराजला रुग्णवाहिकेने कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!