- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका दुकान मालकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील ११ लाख ४० हजारावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला घातल्याचा प्रकार नागपूरच्या लकडगंज परिसरातील घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ काल बुधवारी उघडकीस आला.कर्मचारी हा रोकड घेऊन बँकेत जमा करण्यासाठी निघाला असतांना सदर घटना घडली. घटनेची माहिती होताच पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल,परिमंडळ क्रमांक ३ च्या पोलीस उपायुक्त महक स्वामी,सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत जी.चांदेवार, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत किचक,लकडगंज पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक नयना माहुलकर यांनी घटनास्थळी भेट दिली.मात्र,अज्ञात चोरट्यांचा रात्रीपर्यंत धांगपत्ता लागलेला नाही.
शेख मुजफ्फर उर्फ गुड्डू वय ४८ वर्षे,रा.टिमकी पोलीस चौकीजवळ हा तीननल चौकातील प्रतवी मेटलचे (लोहा)मालक किरण चिंचललापुरे यांच्याकडे काम करतो.तो दुकानातील ११ लाख ४० हजारांची रोकड एका काळ्या रंगाच्या पिशवीत टाकून सीएच्या टेलिफोन एक्सचेंज चौकतील एचडीएफसी बँकेमध्ये जमा करण्याकरीता त्याच्या स्कूटरवरुन जात होता. अशातच घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ एका काळ्या रंगाच्या स्कूटरवून आलेल्या तीन अज्ञातांनी पाठीमागून येऊन त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली.त्यातच मारहाण करून,शस्त्राचा धाक दाखवून रोकड असलेली काळ्या रंगाची पिशवी जबरदस्तीने घेऊन पसार झाले.घटनेची माहिती मिळताच मालक किरण चिंचललापुरे यांनी घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
- Advertisement -

