- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-२० वर्षीय तरुणीचे गावातीलच एका युवकासोबत सूत जुळले होते.मात्र,तरुण हा दुसऱ्या समाजातील असल्याने त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होता.त्यामुळे दोघेही पळून गेले होते.काही दिवसांपूर्वी तरुण व तरुणी गावात परत आले होते.दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर तरुणी वडिलांच्या घरी परतली.कुटुंबीयानी तिच्यासाठी स्थळ बघितले होते. गुरुवारी ९ ऑक्टोंबरला तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते.मात्र,अज्ञाताने तिचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.आचल प्रकाश कोबळे वय २० वर्षे,रा.बोंडराणी, ता.तीरोडा,जि.गोंदि या असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.तर नितेश कोडवते वय २३ वर्षे,रा.अर्जुनी, ता.तिरोडा,जि.गोंदिया असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.दवनीवाडा पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.
आचल कोबडे हिचे आरोपी नितेश सोबत प्रेमसंबंध होते. पळून आल्यानंतर घरच्यांनी समजावून तिला घरी नेले होते.त्यामुळे आरोपी नितेशच्या मनात राग होता. अश्यातच आचलच्या विवाहासाठी तिच्या कुटुंबीयांनी स्थळ पाहणे सुरू केले होते.यामुळे आरोपी भांबावून गेला होता.गुरुवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास आरोपीने आचलला बोंडराणी जंगल परिसरात भेटण्यासाठी बोलाविले होते.दोघांमध्ये बोलणे सुरू असतांनाच आरोपी नितेशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने आचलच्या गळ्यावर व हातावर वार करून हत्या केली.हत्या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.प्रकरणाचा तपास पीएसआय वैशाली ढाले करीत आहेत.
- Advertisement -

