- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-ग्रामपंचायतीच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले होते. दरम्यान,आंदोलनाला यश आले आहे.ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.मंत्री महाजन यांच्या
मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात
आले आहे.सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव
आठवड्यात मान्य करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी आश्वासन दिले आहे.
सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.ग्रामपंचायतींच्या निधीबाबत लवकरच तोडगा काढला जाईल,असेही महाजन यांनी प्रसंगी म्हटले आहे.मानधन अल्प आहे,त्यात वाढ करावी; अशी मागणी सरपंचांनी केली होती.येत्या ८ दिवसांत कॅबिनेट निर्णय होईल,असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.
ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील,तर १५
लाखांपर्यंत कामे द्यावीत; अशी मागणी केली होती.
पण कोर्टाचा निर्णय असल्याने ३ लाखांपर्यंत कामे
देता येतात.त्यात देखील तोडगा काढला जाईल
असे महाजन यांनी म्हटले.इतर तांत्रिक मागण्या
आहेत; त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या
जातील.प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक
आहे.लवकरच त्यावर निर्णय होईल; असे महाजन
यांनी सांगितले.
सरपंचांना १५ हजार रुपये,उपसरपंचाला १० हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला ३ हजार रुपयांचे मानध मिळावे,ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा,पेन्शन,निश्चित वेतन लागू करावे,मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे,ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी,संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे,यावलकर समितीचा अहवाल लागू करावा,संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा, ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊनविकासकामे करण्याचा अधिकार द्यावा; इत्यादी मागण्या घेऊन सरपंच संघटनांनी संप पुकारला होता.
- Advertisement -

