Tuesday, September 8, 2026
Homeमुंबईअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,आज जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या यादीत फक्त ५३३ शेतकऱ्यांचीच नावे असल्याचे समोर आले आहे. यात नागपूर जिल्हा बँक,पुणे जिल्हा बँक,ठाणे जिल्हा बँक,लातूर जिल्हा बँक,सातारा जिल्हा बँक आणि अमरावती जिल्हा बँकेचे मिळून ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.यादीचे अपलोडींग करणे सुरू आहे. जे शेतकरी आयकरमध्ये(इन्कम टॅक्स)बसत नाहीत, अश्या शेतकऱ्यांचीच पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.इन्कम टॅक्सची यादी येताच पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असून काही तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागत आहे; असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माहिती देतांना स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर,महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांना देखील २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल.३६ हजार ५८५ कोटी आणि १२ लाख शेतकऱ्यांचे ४ हजार ३९५ कोटी मिळून ४० हजार ९८० कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे.यावेळी राज्य सरकारकडून प्रातिनिधिक पद्धतीने आज कर्जमाफीतील पात्र असलेल्या ५३३ शेतकऱ्यांच्या नावांची यादी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून शासनाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. कर्जमाफीची यादी संबंधित बँका आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ देण्यात येणार आहे.त्यातच,कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फॉर्मर आयडी, आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक प्रणालीवरील नोंदणी करणे बंधनकारक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!