- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-खापा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिरोंजी ता.सावनेर शिवारातील भानगाडा नाल्यात गुरुवारी १४ मार्च २०२५ रोजी मृत वाघ आढळून आला होता. मिशा,दात व चार पंजे गायब असल्याने त्याची इलेक्ट्रिक करंटचा वापर करून शिकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते.या शिकारीच्या तपासात पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिछवा (मध्य प्रदेश) पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती गोळा केली.त्याआधारे पंढरी कुंभरे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.त्याने गुन्ह्याची कबुली देत इतरांची नावे सांगितली.त्यामुळे पोलिसांनी इतरांना त्यांच्या गावांमधून ताब्यात घेत सर्वांना अटक केली आहे.पंढरी उकंडराव कुंभरे वय ४५ वर्षे,नंदू शंकर भलावी वय ४९ वर्षे,दोघेही रा.सोनपूर, ता.सावनेर, जि.नागपूर,किशोर दौलत भलावी वय ३२ वर्षे,रा. चोरखैरी,ता.सावनेर व छेदीराम घासीराम ठाकूर वय ५७ वर्षे,रा.कुकरीकोता,जिल्हा बलोदा बाजार, छत्तीसगड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिकाऱ्यांची नावे आहेत.
सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांनी माणिक कुदरी सिलू वय ४८ वर्षे व राजू मानसिंग दरसामा वय ३५ वर्षे, दोघेही रा.तोरणी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांनी मागील वर्षी विद्युत तार व बांबूच्या खुंट्यांचा वापर करून वाघाची शिकार करण्यासाठी फासे लावल्याचे तसेच ११ हजार केव्ही क्षमतेच्या तारांवरून वीज वाहून नेण्यासाठी सेंट्रिंगच्या तारांचा वापर केल्याचे सांगितले.हीच माहिती पोलिसांना उपयुक्त ठरली.वन विभागाच्या पथकाने अटकेतील चारही शिकाऱ्यांना मंगळवारी सावनेर शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते.त्यानुसार न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसांची पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
- Advertisement -

