Sunday, May 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी मुदतवाढ..

अखेर लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून सुरू केलेली ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी ठरू लागली आहे.या योजनेचा लाभ दरमहा दीड हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांना दिला जातो.योजनेअंतर्गत फेब्रुवारी-२०२६ पर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभ देण्यात आला आहे.अश्यातच ज्या महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या,अशांसाठी शासनाकडून ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र,राज्यातील जास्तीत-जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणीही वंचित राहू नये,यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज,बुधवार १ एप्रिल रोजी या योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केली आहे.त्यानुसार,आता सदरची मुदतवाढ ही चालू महिन्याच्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.यामुळे महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी आणखी ३० दिवस मिळाले आहेत.ई-केवायसी प्रक्रियेत काही महिलांकडून त्रुटी राहिल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या.त्यामुळे,सदरची मुदतवाढ ही शेवटची संधी,असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सदरची मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!