Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

अखेर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला; अंडर-१९ विश्वचषक सहाव्यांदा जिंकला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज शुक्रवारी झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरून तब्बल सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे.भारताने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे.भारताने यापूर्वी २०००,२००८,२०१२,२०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता.अश्यातच आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद पटकावून भारताने अंडर-१९ क्रिकेटमधील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्ण घेतला.प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या.लक्ष्यप्राप्ती करतांना इंग्लंडला फक्त ३११ धावा करता आल्या.यात भारताने तब्बल १०० धावांनी विश्वचषक जिंकला.भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने ८० चेंडूंत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या.कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा केल्या.४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवरच गारद झाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!