- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.त्यानुसार,आता योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे.विशेष म्हणजे,सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे.राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सविस्तर अहवाल तयार केला असून,यामुळे सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. अहवालानुसार,राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत.त्यांच्याकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.यात सोलापूर,पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,नांदेड आणि अहिल्यानगरसह एकूण १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे.केवळ पीककर्जच नव्हे,तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला असून,३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ३० जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
- Advertisement -

