- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे सोमवारी शहरातील एका प्रेमीयुगुलाचे पुनर्मिलन झाले.प्रेमीयुगुलाने लग्न केल्याने प्रेयसीच्या वडिलाने तिला बळजबरीने स्वतःच्या घरात डांबून ठेवले होते. त्यामुळे प्रियकराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.प्रकरणावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.त्यानुसार आता नागपुरातील एका आंतरजातीय विवाहित जोडप्याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.न्यायालयाने या जोडप्याला तीन महिन्यांसाठी सेफ हाऊसमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.राज्य शासनाच्या सेफ हाऊस उपक्रमांतर्गत हे पहिलेच प्रकरण आहे.
२५ वर्षीय तरुणी आणि एका व्यावसायिकाने २१ डिसेंबर २०२३ रोजी स्वेच्छेने विवाह केला.तरुणी वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहे. विवाहानंतर तरुणीच्या वडिलांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तरुणीला घरात डांबून ठेवले.तिला सोडवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
- Advertisement -

