Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजटेबलाखालून छपाई करणाऱ्यांची टीम ॲक्टिव्ह होताच अवैध गौण खनिज चोरांचा सुळसुळाट..!

टेबलाखालून छपाई करणाऱ्यांची टीम ॲक्टिव्ह होताच अवैध गौण खनिज चोरांचा सुळसुळाट..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-म्हणतात ना ‘हम नहीं सुधरेंगे’ अशीच प्रचिती हल्ली गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात उघडकीस येऊ लागल्याने किती हास्यास्पद म्हणावे लागेल.अशातच आता टेबलाखालून छपाई करणाऱ्यांची टीम ॲक्टिव्ह होताच अवैध गौण खनिज चोरांचा परत पुन्हा सुळसुळाट सुरू झाल्याच्या चर्चा तालुक्यात सर्वत्र दबक्या आवाजात सुरू झाल्यात. त्यामुळे काहीकाळ थंड पडलेले खिसे,गरम तर होऊ लागले नाहीत ना..! अश्या चर्चांना उधाण आले आहे.
सध्या स्थितीत जिल्ह्यात,तालुक्यातच नव्हे तर राज्यात सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे.मात्र,दिवसाढवळ्या तसेच खुलेआम गौण खनिज चोऱ्यांना प्रोत्साहित करणारे बाहेर ठिकाणाहून जिल्ह्यात पदार्पण करून,झोऱ्या भर-भरून,काळा पैसा गोळा करून घेऊन जाऊ लागलेत.इतर कामामांव्यतिरिक्त अवैध गौण खनिज चोरीच्या माध्यमातून छप्पर फाड कमाई होत असल्याने काहीकाळ ज्यांचा कुठल्याही क्षेत्रात नामो निशाण नव्हता,अशांना आता ‘भाईजी’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.’मैं झुकेगा नहीं पर सबको झुकाऊंगा’ असे करीत इथे ‘पैसा बोलता हैं’ अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे अनेकजण नतमस्तक होऊन ‘भाईजी’ चीच भाषा वापरू लागले आहेत. टेबलाखालून छपाई करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे.मात्र,त्यास काही मर्यादाही आहेत; अन्यथा मर्यादे पलीकडे नर्मदा परिक्रमा करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुख्यत्वे टाळी एकाच हाताने वाजत नाही.पण ज्यावेळी टाळी वाजविणारे हात उंच दूरवर गेले की,स्वतःला सावरण्याची संधी मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.म्हणतात ना,कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही,इथे सर्वजण एकाच लाईनमध्ये उभे होत असतात.त्यामुळे टेबलाखालून छपाई करणाऱ्यांची टीम ॲक्टिव्ह जरी झाली असली तरीही ‘जरा थांबा..पुढील घंटा ही धोक्याचीच’ म्हणावीच लागेल,असे काहींचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!