Wednesday, August 26, 2026
Homeमुंबईअखेर तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर; लग्नास नकार दिल्याने महिलेने केली होती आत्महत्या..

अखेर तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर; लग्नास नकार दिल्याने महिलेने केली होती आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एका तरुणाची मुंबईतील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली.कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.लग्न करू म्हणून तरुणाने अनेक भेटींनंतर शारीरिक संबंध ठेवले होते.अशातच तरुणाने इतर महिलांशी संपर्क वाढवला.याबद्दल फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला याची कानकुन लागली.यातून वादावादी झाल्यानंतर तरुणाने महिलेशी बोलणे टाळले.त्यामुळे  नैराश्यातून महिलेने ३ डिसेंबर २०२४ रोजी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले होते.प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तरूणाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानुसार सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर.नवंदर यांनी जामीन देतांना स्पष्ट केले की, प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा काही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही,अनेकदा प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणांत लग्नाचे वचन मोडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातो.मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक हेतूच नसतो,असा महत्वपूर्ण निर्वाळा देत सत्र न्यायालयाने  प्रकरणातील आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.त्यावर सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता.अर्जदार तरुणाचे आत्महत्या केलेल्या महिलेशी प्रेमसंबंध होते.मात्र त्या तरुणाच्या अनैतिक कृत्यांमुळे महिलेला जीव गमवावा लागला.अशा परिस्थितीत तरुणाचे कृत्य आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे आहे,असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.तरुणाच्या वकिलांनी मात्र आरोपाचे खंडन केले.महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा हेतूच नव्हता,असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!