Thursday, September 3, 2026
Homeनागपूरअखेर ऑनलाईन लॉगीन आयडी व पासवर्ड चोरणारा आरोपी पोलिसांच्या हाती.. -...

अखेर ऑनलाईन लॉगीन आयडी व पासवर्ड चोरणारा आरोपी पोलिसांच्या हाती.. – पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच आवळल्या मुसक्या; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात रोज नवनवीन घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे
ऑनलाईन लॉगीन आयडी व पासवर्डची चोरी करून शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बनावट शालार्थ आयडी करीता ड्राफ्ट तयार करणाऱ्या मास्टरमाईंडच्या नागपूर सदर पोलिसांनी आज,बुधवार २१ मे रोजी मुसक्या आवळून सायबर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.आरोपी लक्ष्मण उपासराव मंघाम वय ४७ वर्षे हा नागपूरच्या वाडी परिसरातील दाभा येथील वासंती अपार्टमेंटमधील ३०२ क्रमाकांच्या सदनिकेत वास्तव्यास होता.याने शिक्षण विभागाचे उप संचालक उल्हास नरड यांचा पासवर्ड चोरी करून घरी बसून बनावट शालार्थ आयडी तयार केले होते.आरोपी लक्ष्मण मंघाम हा नागपूर सोडून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता.अश्यातच सदर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रलेश कापसे व सुशिल श्रीवास यांना गोपनीय माहिती मिळाली.आरोपी मंघाम घर सोडण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी अत्यंत शिताफितीने त्याला ताब्यात घेतले आहे.आरोपी लक्ष्मण मंघाम विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील राजेंद्र पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती.मंघाम याने २० मार्च २०१९ ते आजतागायत चौकशी अधिकाऱ्याच्या यादीमधील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बनावट शालार्थ आयडी करीता ड्राफ्ट तयार केला होता.या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार झालेत.त्यानुसार आता आरोपी लक्ष्मण मंघाम विरूध्द सायबर पोलिस ठाण्यात कलम ३१९ (२),३१८ (४),३३८,३३६ (३),३४० (१),३४० (२)भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!