- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-हॅकर्स सर्वसामान्य नागरिकांसह आता मंत्र्यांच्याही सोशल मीडिया वरील अकाऊंटवर नजरा लावून बसल्याचे दिसून येत आहेत.हॅकर्स नवनवीन तंत्रशैलिंचा वापर करून,सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करून,आक्षेपार्ह मजकूर टाकून अडचणीत आणीत असतात.असाच प्रकार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री दिती तटकरे यांच्या बाबतीत घडलेला आहे.मंत्री दिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे.अज्ञात हॅकर्सनी अदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले असून त्यावरुन काही आक्षेपार्ह पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत.याबाबतची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली असून आक्षेपार्ह पोस्टवर व्यक्त न होण्याचे आवाहन केले आहे.या प्रकरणी आदिती तटकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- Advertisement -

