Monday, October 26, 2026
Homeदेसाईगंजपत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी... - देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव...

पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी… – देसाईगंज तालुक्याच्या कोरेगाव येथील प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीच्या डोक्यावर खलबत्त्याने वार करुन खून केला व नंतर शेजारील विहिरीत टाकले असल्याची घटना काल, बुधवारी १६ ऑक्टोंबरच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे उघडकीस आली होती.स्नेहा लोकेश बाळबुद्धे वय ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती लोकेश गुणाजी बाळबुद्धे वय ३५ वर्षे याच्याविरुद्ध देसाईगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आज,गुरुवारी १७ ऑक्टोंबरला आरोपी लोकेश बाळबुद्धे यांस न्यायालयात हजर केले असता,त्याला न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोघा पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेल्याने लोकेशने घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर मारला होता.डोक्यावर वार केल्याने स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.त्यामुळे पत्नी मरण पावली असे आरोपीच्या लक्षात येताच तिला उचलून घराबाहेरील चौकातील विहिरीत नेऊन टाकले व स्वतःच ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते.त्यानुसार आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!