- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आता भारतातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवण्यात आली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता.आता त्यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती लावण्यात आली आहे.
आधीच्या मूर्तीवर डोळ्यांवर काळी पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची.आता नव्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली गेली आहे. तसेच हातात तलवारच्या ऐवजी संविधानाची प्रत दिसते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामते आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा आणि वारशाच्या पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच अंध असू शकत नाही.तो सर्वांना समान पद्धतीने पाहतो.यामुळेच सरन्यायाधीश न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल केला जाण्याची गरज असल्याचे म्हटले होते.त्याच बरोबर देवीच्या एका हातात तलवारच्या जागी संविधान पाहिजे.ज्यामुळे समाजात संदेश जाईल की,देवी संविधानानुसार न्याय करते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
सरन्यायाधीशांच्या मते तलवार हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालयात हिंसा नाही तर संविधानाच्या कायद्यानुसार न्याय होतो.दुसऱ्या हातात असलेला तराजू योग्य आहे जो सर्वांना समान पद्धतीने न्याय देते.माहितीनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशानंतर न्यायदेवतेची नवी मूर्ती तयार करण्यात आली.अशी पहिली मूर्ती न्यायधीशांच्या ग्रंथालयाबाहेर लावण्यात आली.ज्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी नाही आणि हातात तलवार ऐवजी संविधान आहे.
न्यायदेवतेची मूळ मूर्ती यूनानमधील प्राचीन देवी असल्याचे सांगितले जाते.तिला न्यायाचे प्रतीक म्हटले जाते.या देवीचे नाव जस्टिया असून त्यातूनच जस्टिस हा शब्द तयार झाला.या देवीच्या डोळ्यावर कायम पट्टी असायची,याचा अर्थ न्यायदेवी नेहमी निष्पक्ष राहून न्याय करेल.कोणाला पाहून न्याय करताना निर्णय एकाच्या बाजूने दिला जाऊ शकतो; यासाठी ही पट्टी बांधण्यात आली होती.
- Advertisement -

