Saturday, June 13, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील उर्वरित पुरबाधित शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाईल क्रमांक द्यावे... -अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेपासून...

कोंढाळा येथील उर्वरित पुरबाधित शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाईल क्रमांक द्यावे… -अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेपासून राहणार वंचित.. – देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांचे आवाहन..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील कोंढाळा,कुरुड, आमगाव व सावंगी गावातील शेतकरी बांधवांच्या उभ्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी; याकरीता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचेसह भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पुरबाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशातच आता शासन स्तरावरून पूरग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याकरिता मोबाईल क्रमांक अनिवार्य केले असल्याने कुरुड,आमगाव व सावंगी गावातील शेतकऱ्यांनी गावातील तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिल्याने सदर शेतकऱ्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र,कोंढाळा गावातील पूरबाधित नुकसानग्रस्त ४५० शेतकऱ्यांपैकी ५८ शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत तलाठी वा ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिले नसल्याने कोंढाळा गावातील शेतकऱ्यांना अजून पावेतो नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यानुसार आता उर्वरित ५८ शेतकरी मागील वर्षाच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित राहू शकतात.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत मोबाईल क्रमांक दिला नसेल,अशा शेतकऱ्यांनी लवकरात-लवकर मोबाईल क्रमांक देण्याचे करावे; असे आवाहन देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी केले आहे.
सुनील पारधी,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष👇
वर्ष २०२३ मधील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पूरग्रस्त शेतीच्या नुकसानीची रक्कम शासनाकडून केव्हाचीच प्राप्त झाली आहे.त्याचबरोबर वर्ष २०२४ म्हणजेच चालू वर्षातील जुलै तसेच सप्टेंबर महिन्यातीलही पूरग्रस्त शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली असून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!