- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयाला विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिली.
शुक्रवारी याबाबत शासन निर्णय निर्गमीत झाल्याने देसाईगंज येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे.यामुळे अनेक गरजूंना वेळेत उपचार मिळण्यास लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या विशेष सहकार्याने आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांमुळे देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा काल, शुक्रवार दिनांक-४ ऑक्टोंबर २०२४ ला शासन निर्णय जारी केला आहे.
देसाईगंज येथील पूर्वीच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.देसाईगंज शहर हे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे.देसाईगंज शहरात बाहेर ठिकाणांहून खरेदी-विक्री करण्यास मोठ्या प्रमाणावर व्यापारी,नागरिक व इतर प्रवाशांची नेहमीच रेलचेल असते.अशातच एखादेवेळी मोठे अपघात घडल्यास वा परिसरातील इतर रुग्णांना तातडीचे वैद्यकीय उपचार सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढतच चालले होते.त्याचप्रमाणे अपघात ग्रस्तांना पाहिजे त्या प्रमाणात वेळेत उपचार मिळत नसल्याने रूग्णांना केव्हा-केव्हा मृत्यूशी झुंज देत मृत्युमुखी पडण्याची वेळ येत होती.उपजिल्हा रुग्णालयामुळे रुग्णांना वेळेत उपचार होऊन रेफर गळतीचे प्रमाण कमी होणार आहे.शासनाच्या या निर्णयानंतर देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार मानीत आनंद व्यक्त केला आणि शासनाचे सुध्दा आभार मानले आहे.
कृष्णा गजबे,आरमोरी विधानसभा क्षेत्र👇मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरास लेखी आदेशाने मान्यता दिली आहे.सर्व जनता-जनार्दन यांच्या आशीर्वादानेच कार्य झाल्याने,मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

