Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता पोलिसांनाही हवा 'या ' कारणासाठी मोबाईल भत्ता...

आता पोलिसांनाही हवा ‘या ‘ कारणासाठी मोबाईल भत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली सर्वात जास्त मोबाईलचा वापर वाढलेला दिसून येतो.ऑनलाईन चे काम असो वा इतर कामे मोबाईल वरूनच केली जातात.अशातच भारतीय दंड संहितेमध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता हा नवा कायदा अंमलात आला असून,यामध्ये तांत्रिक पुराव्यांवर भर देण्यात आला आहे.पुरावे जमा करणे, पंचनामा,साक्षीदारांचे जबाब याचबरोबर गुन्ह्यासंदर्भातील लहानसहान बाबी ऑनलाइन पद्धतीने अपलोड कराव्या लागत असल्याने पोलिसांना मोबाइलचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो.यासाठी जास्त मेमरी असलेला अद्ययावत मोबाइल फोन व इंटरनेट डेटाची गरज भासत असून, यामुळे आर्थिक फटका बसत आहे.म्हणूनच सरकारने मोबाइल भत्ता सुरू करावा; अशी मागणी पोलिस दलातून केली जात आहे.
पोलिसांना वेगवेगळे प्रकारचे भत्ते दिले जातात.मात्र, त्यामध्ये मोबाइल भत्त्याचा समावेश नाही.भारतीय दंड विधानमध्ये आमूलाग्र बदल करून जुलै २०२४पासून भारतीय न्याय संहिता अंमलात आणण्यात आली. तेव्हापासून पोलिस दलामध्ये मोबाइल भत्त्याची कुजबूज सुरू झाली आहे.याआधी पोलिस संपर्क, जनसंपर्क, आणीबाणीच्या काळात व्हॉट्सॲप समूहांद्वारे हद्दीतील नागरिकांना तातडीने विनंती, सूचना करण्यासाठी मोबाइलचा वापर व्हायचा.नंतर मोबाइलवरून व्हॉट्सॲपद्वारे आरोपी,साक्षीदारांना नोटीस,वॉरंट पाठवले जाऊ लागले.आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवे कायदे लागू झाल्यानंतर पोलिसांना अनेक गोष्टींसाठी मोबाइलवर अवलंबून राहावे लागत आहे.
नव्या कायद्यातील तरतुदींनुसार,तक्रार,साक्षीदार आणि आरोपींचा जबाब व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचे बंधन आहे.तक्रारदाराच्या जबाबापासून साक्षीदारांची साक्ष, पुरावे,न्याय वैद्यकीय पुरावे,परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे,मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया, पंचनाम्यांचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते ई-साक्ष ॲपमध्ये अपलोड करावे लागतात.त्यासाठी चांगल्या दर्जाचा मोबाइल, छायाचित्रे-व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जास्त मेमरी आणि ते अपलोड करण्यासाठी इंटरनेट डेटा लागतो असे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिस ठाण्यातील कामकाजाचे वाटप, नियोजन व्हॉट्सॲपद्वारे कळवले जाते.त्यामुळे मोबाईल भत्त्याची मागणी केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!