- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक येत्या ७ ऑक्टोंबर रोजी अयोध्या करिता रवाना होणार असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देसाईगंज (वडसा)येथे भाविकांच्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार नामदेव कीरसान आमदार कृष्णा गजबे व डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैंने,समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख,सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक-७ ऑक्टोंबरला रेल्वे ११ वाजता देसाईगंज (वडसा)स्टेशन वरून निघेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाराणसी येथे पोहचेल.तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन आणि वाराणसी दर्शन आणि मुक्काम असेल.त्यानंतर ९ ऑक्टोंबरला सकाळी अयोध्या येथे पोहचेल आणि तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेणार आणि रात्री परतीचा प्रवास करेल.१० ऑक्टोंबरला दुपारी १२ वाजता देसाईगंज(वडसा)स्टेशन येथे भाविक परत येणार आहेत.भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाज कल्याण विभागाचे कर्मचारी राहणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी कळविले आहे.
- Advertisement -

