Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा क्षेत्रात निवडून येण्यायोग्य उमेदवार न दिल्यास आम्ही आघाडीतून बाहेर पडू......

आरमोरी विधानसभा क्षेत्रात निवडून येण्यायोग्य उमेदवार न दिल्यास आम्ही आघाडीतून बाहेर पडू… -समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-विधानसभेची निवडणूक जस-जशी जवळ येऊ लागली आहे; तस-तशी विधानसभेची उमेदवारी मिळविण्यावरून तसेच उमेदवारी ठरविण्यावरून कहाण्यांमध्ये ट्विस्ट समोर येऊ लागले आहेत.अवघ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार
निवडणुकीच्या तयारीत लागले आहेत.अशातच
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कडून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात निवडून येण्यायोग्य उमेदवार न दिल्यास आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडू आणि समाजवादी पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार आरमोरी विधानसभा क्षेत्रात उभा करू; असे खळबळ जनक विधान समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान यांनी केला आहे.
या विधानाने गडचिरोली जिल्ह्यातील आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता दिसत आहे.तसेच आणखी समविचारी पक्ष् सोबत घेऊन जिल्ह्यात येणारी विधानसभा निवडणूक लढवीणार असेही मत त्यांनी मांडले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हे एकाच माळ्याचे मनी असून फक्त सत्तेच्या लालसेपोटी आपले राजकारण करीत आहेत.जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत; याकडे दोन्ही पक्ष मुद्दाम कानाडोळा करीत आहेत.अश्या स्वार्थी लोकांना यांची जागा दाखविणे आवाश्यक आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व आघाडीतील मित्र पक्षांना सोबत घेऊन उमेदवार निवडावे आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राला योग्य उमेदवार द्यावा; अन्यथा आम्ही बाहेर पडू असाही ईशारा इलियास खान यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!