Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात ईद निमित्त काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण...

देसाईगंज शहरात ईद निमित्त काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज,सोमवार दिनांक-१६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांची देसाईगंज शहरातून रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये लहानांपासून ते थोरांपर्यंत मुस्लिम समाज बांधव एकत्र येत गळाभेट घेऊन सर्वांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत होते.विविध समाज बांधवांच्या वतीनेही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.अशातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहराच्या ब्रम्हपुरी रोड लगत असलेल्या जामा मस्जिद समोर ईद दिनाचे औचित्य साधून सर्व मुस्लिम समाज बांधवांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने मिठाईचे वितरण करण्यात आले व पुष्पगुच्छ देत समाज बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक एकोपा जपण्यात आला.
यावेळी काँग्रेस नेते रामदास मसराम,मोरू मोहुर्ले, सागर वाढई,स्वप्नील मिसार,जावेद शेख,लंकेश ढोरे, गौरव शिलार,रेशीम प्रधान,दुषांत वाटगुरे,आकाश पेटकुले,रोशन कवासे,गोपाल दोनाडकर आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!