Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

देसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात आज, सोमवार दिनांक-९ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांच्या नेतृत्वात देसाईगंज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी ‘जाहीर निषेध’ या बॅनरखाली शिवप्रेमींनी शिव गर्जना करीत सरकारच्या विरोधात घोषणा देत घटनेचा निषेध करण्यात आला.या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संघटना तसेच विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देसाईगंज शहरातून सरळ उपविभागीय कार्यालय या ठिकाणी शिवप्रेमी गोळा होत निषेध मोर्चा काढण्यात आला.शिवप्रेमींनी हातात निषेध व्यक्त करणारा बॅनर घेऊन “निषेध असो,निषेध असो,शिवद्रोही सरकारचा निषेध असो”, “छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो” “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो,राजीनामा दो” “छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही”, “छत्रपतींच्या सन्मानात,शिवप्रेमी मैदानात” “जय जिजाऊ जय शिवराय” “जय भवानी जय शिवाजी” “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे ” शिवद्रोही सरकार होश में आव” अशा गगनभेदी घोषणांनी देसाईगंज उपविभागीय कार्यालय दणाणून गेले होते.
सदर मोर्चाचे नेतृत्व देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांनी केले तर अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम होते.थोडक्यात मार्गदर्शन ओबीसी समाज संघटना देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे, बौद्ध समाज कोर कमिटी देसाईगंजचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,सामाजिक कार्यकर्ते चक्रधर पारधी,कमलेश बारस्कर,अनुज घोसे,निशांत वनमाळी यांनी केले.
यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू बुल्ले,
परसराम टिकले,नितीन राऊत,अरुण कुंभलवार,विलास बनसोड,शरद राऊत,दूर्वाजी नाईक, महेंद्र खरकाटे, एन.डी.प्रधान,राजू मेश्राम,सुनील सहारे, तेजस नवघरे, जितेंद्र चौधरी,कार्तिक कोसेकर,रेशीम
प्रधान,लंकेश ढोरे,गोपाल डोनाडकर,आशुतोष भरणे, विजय पिल्लेवान,रोशन कवासे,दुशांत वाटगुरे,रजनी आत्राम,वैष्णवी आकरे,लता धांडे व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असला तरी महराजांचे विचार अजूनही जिवंत आहेत.. अश्या समाज कंटकांना आम्ही नक्कीच धडा शिकऊ; असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!