Wednesday, August 26, 2026
Homeकुरखेडातळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे वाढला कल..! - गावठी दारू पिण्यासाठी दररोज लागतात...

तळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे वाढला कल..! – गावठी दारू पिण्यासाठी दररोज लागतात रांगा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :-  तालुक्यात तळीरामांचा गावठी दारू पिण्याकडे कल वाढून ग्रामीण भागात गावठी मोहफुलांची दारू पिण्यासाठी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर दररोज रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.गावठी दारू विक्रेत्यांकडे कुरखेडा पोलीस  प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने भेसळयुक्त दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

कुरखेडा तालुक्यात दारू पिणारे गावठी मोहफुलांच्या दारूच्या शोधात गावोगावी भटकंती करतांना दिसून येत आहेत.गावठी दारूचा महापूर सध्या स्थितीत ग्रामीण भागात जोर धरू लागला आहे.गावठी दारू स्वस्त दरात मस्त असल्याने तळीरामांचा कल वाढला आहे.काही गावठी दारू विक्रेते भेसळयुक्त दारू विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येते.गावठी दारूमध्ये युरिया खत,नवसागर,गुंगी येणारी औषधे,झाड पत्ति व इतर साहित्य पदार्थांची मिलावटी करून दारूची विक्री करीत आहेत.गावठी दारू विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळून मिलावटी करून दारू विक्री करीत असल्याने दारू विक्रेते मालामाल व पिणारे कंगाल अशी अवस्था झाली आहे.यासाठी अवैध गावठी दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!