Friday, October 9, 2026
Homeचंद्रपूरफरार शिक्षक सापडले; दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - अल्पवयीन विद्यार्थिनीचे...

फरार शिक्षक सापडले; दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी – अल्पवयीन विद्यार्थिनीचे विनयभंग प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वरोरा शहरातील नामांकित विद्यालयातील शिक्षकांनी वाढदिवसानिमित्त बोलावून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी उघडीस आली होती.या प्रकरणातील आरोपी धनंजय पारके व प्रमोद बेलेकर यांना पोलिसांनी अटक करून काल,शनिवारी ३१ऑगस्टला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींविरोधात वरोरा पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात (अप क्र.६११/२४) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत कलम वाढ करून कलम ३ (१) (w) (i) (ii) व ३ (२) (va) चा समावेश करण्यात आला आहे.या आरोपींना पोलिस बंदोबस्तात चंद्रपूरला रवाना करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निओमी साठम यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!