Saturday, October 17, 2026
Homeभंडारामूलबाळ नसलेल्यांना संतान प्राप्तीचा दावा; ज्योतिषांना दोन वर्षांचा सश्रम कारावास...

मूलबाळ नसलेल्यांना संतान प्राप्तीचा दावा; ज्योतिषांना दोन वर्षांचा सश्रम कारावास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-निसंतान व्यक्तींना अपत्यप्राप्ती करून देण्याचा दावा करणारे पत्रके वाटून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या दोन ज्योतिषांना लाखनी येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी दोन वर्षांच्या सश्रम करावासाची व दहा हजारांची शिक्षा सुनावली. रामदास तुळशीराम वाईकर व रमेश दादाराम वाईकर रा.कारली,जि.यवतमाळ अशी त्यांची नावे आहेत.
लाखनी येथील अलंकार लॉज येथे रामदास वाईकर व रमेश वाईकर रा.कारली जि.यवतमाळ यांनी खोली भाड्याने घेतली.या दोन्ही ज्योतिषांनी स्वतःच्या नावाने पत्रके छापून ती लाखनी शहरात वाटली.या पत्रकात त्यांनी मूलबाळ नसलेल्यांना संतान प्राप्त करून देणे,पती-पत्नीचे वाद मिटवून देणे,वास्तूदोष दूर करणे,प्रेमिकांमध्ये अडचणी येत असल्यास त्यांचे निराकरण करून देऊ इत्यादी बाबी नमूद केल्या होत्या.
कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी अलंकार लॉज मधील रूम नंबर १५ मध्ये येऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.सदर पत्रक लाखनी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी अश्विनी दिलीप भिवगडे यांना मिळाले. त्यांनी याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे जिल्हा प्रधान सचिव विष्णुदास लोणारे यांना दिली. त्यानंतर अश्विनी भिवगडे,विष्णुदास लोणारे,प्रशांत रामटेके हे अलंकार लॉज येथील ज्योतिषांना भेटायला गेले.तेव्हा ज्योतिष रामदास वाईकर व रमेश वायकर यांना अश्विनी भिवडगे यांनी त्यांच्या लग्नाला सोळा वर्षे झाली असून मूलबाळ होत नाही; असे सांगितले. तेव्हा ज्योतिषांनी येत्या पंधरा महिन्यांत तुम्हाला मूलबाळ होईल.मात्र,त्याकरिता तुम्हाला पूजा करावी लागेल,असा उपाय सुचविला.पूजेसाठी लाल कपडा, उडीद,तुळशीची पाने,जन्मपत्रिका,आठशे रुपये व इतर साहित्य आणावे लागेल असे सांगितले.त्यावेळी पन्नास रुपये रोख घेऊन सर्व साहित्य घेऊन दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लाखनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली.पोलिसांनी धाड घातली.लॉजमधून पूजेचे साहित्य,कलश,नारळ, फोटो, पंचांग इत्यादी साहित्य जप्त केले.महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) सह कलम ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून ज्योतिष्य रामदास वाईकर वय ३९ वर्षे,रमेश दादाराव वाईकर वय ३४ वर्षे,रा.कारली,जि.यवतमाळ यांना अटक केली.
सदर प्रकरण लाखनी येथील न्यायालयात चालले.या प्रकरणात पाच जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक अभियोक्ता पी. आर.लिंगायत यांनी बाजू मांडली.साक्ष पुरावा व युक्तिवाद ऐकल्यानंतर लाखनी येथील न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (न्यायालय क्रमांक २) एफ.के.सिद्दिकी यांनी रामदास वाईकर,रमेश वाईकर यांना महाराष्ट्र नरबळी आणि इतर माणूस अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व त्याचे उच्चाटन करण्याबाबत दोषी ठरवून दोन्ही आरोपींना दोन वर्षांचा सश्रम करावास व प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!