Tuesday, July 7, 2026
Homeमुंबईवकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन... -मुंबई उच्च...

वकिली व्यवसायात टक्केवारीच्या स्वरुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन… -मुंबई उच्च न्यायालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-वकिलांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.कोणतीही केस लढण्यासाठी वकील त्यांच्या क्लाईंटकडून टक्केवारीच्या स्वरूपात फी मागणी करू शकत नाही; असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. ठाण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.तसेच ठाणे दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले असून त्यासंबंधित गुन्हाही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील वकील शैलेश अमृतलाल शाह यांनी ठाणे दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांच्या स्वतःच्या क्लाईंटच्या म्हणजेच प्रगी रामजी ठक्कर यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.त्यांनी प्रत्येक पक्षकाराला सेटलमेंट मोबदल्याच्या १ टक्के म्हणजे ११,००,००० रुपयांची फी स्वरूपात मागणी केली होती.विशेष म्हणजे १९ सप्टेंबर २०१४ रोजी दंडाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनला संबंधित क्लाईंटविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.मात्र,या आदेशाला ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांनी यासंदर्भात असा युक्तिवाद केला की,दंडाधिकाऱ्यांनी तक्रारदाराने कलम १५४ (१) किंवा (३) नुसार आवश्यक पूर्ततेची खात्री न करता एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते.वकिली व्यवसायात टक्केवारीच्या रुपात फीची मागणी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन केल्याचे देखील यात म्हणले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ एस.एस.बुटाला यांच्या युक्तिवादाला ग्राह्य धरत अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल; असे मत व्यक्त केले आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती भारती डांगे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी जेएमएफसी ने दिलेला २०१४ चा आदेश बाजूला ठेवत तक्रारदार वकील शैलेश शाह यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!