Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरमाणुसकीला काळीमा फासणारी घटना... - २५ वर्षीय मनोरूग्ण महिलेवर बसस्थानकावरील प्रसाधनगृहात अत्याचार..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना… – २५ वर्षीय मनोरूग्ण महिलेवर बसस्थानकावरील प्रसाधनगृहात अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्रात संतप्त वातावरण आहे. महाराष्ट्रभर याचा निषेध नोंदवला जात असतानाच चंद्रपूरमधील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.एका बसस्थानकावरील प्रसाधनगृहात एका मनोरूग्ण महिलेवर अत्याचार करून सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे.ही धक्कादायक घटना नागभीड तालुक्यातील एका बसस्थानक परिसरात १२ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी आज,शुक्रवारी ताब्यात घेतले.मोहिन उमर शेख वय १९ वर्षे,हरीनारायण सुनील मांढरे वय ३० वर्षे,कार्तिक प्रमोद बनकर वय २४ वर्षे,कुणाल राजू पाठक,मयूर मधुकर वंजारी वय १८ वर्षे,सर्व रा. नागभीड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
नागभीडमध्ये सोशल मिडीयावरून अत्याचाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ आज,शुक्रवारी व्हायरल झाला होता.या प्रकरणाची माहिती नागभीड पोलीसांना मिळाली.त्यांनी तात्काळ पीडित महिलेचा शोध घेऊन तिची ओळख पटविली.त्यानंतर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.१२ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास २५ वर्षीय मनोरूग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहुन तिला प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर एका आरोपीने अत्याचार केला तर दुसऱ्या आरोपीने त्या प्रसंगाचा व्हिडीओ तयार केला.आरोपींच्या अन्य सहकाऱ्यांनी त्या महिलेवर अत्याचार करण्यास सहकार्य केल्याची माहिती समोर येत आहे.याप्रकरणी पाच जणांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पाच आरोपींचा कसून तपास करत आहेत. दरम्यान,या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. सोबतच हा कथित व्हिडीओ कुणालाही पाठवू नका व कारवाई ओढवून घेऊ नका; अशी ताकीदही त्यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!