- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पवनगाव येथील जमिनीची मोजणी केल्यानंतर ‘क’ प्रत देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नागपूरच्या कामठी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई नागपूर शहरातील खरबी चौकात बुधवारी २१ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वैभव अशोक पळसापुरे वय ५१ वर्षे रा.खरबी, नागपूर,असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर भूमापकाचे नाव आहे.त्याची कामठी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक (सहायक नझुल परीक्षक) पदी नियुक्ती आहे.फिर्यादी एस.बोरकर यांची पवनगाव (ता.कामठी) येथे सर्व्हे क्रमांक-४०/१ मध्ये ३.२७ हेक्टर जमीन आहे.त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या या जमिनीच्या माध्यमातून पोटहिश्शाची मोजणी केली आणि नियमानुसार ‘क’ प्रत मागितली.वैभव पळसापुरे याने ‘क’ प्रत देण्यासाठी बोरकर यांना ६० हजार रुपयांची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने बोरकर यांनी याबाबत नागपूर शहरातील एसीबीच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.ठरल्याप्रमाणे वैभवन बोरकर यांना रक्कम घेऊन नागपू शहरातील खरबी चौकात बोलावले दुसरीकडे,एसीबीच्या पथकाने चौकात सापळा रचला. वैभवने लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.त्याच्याकडून ६० हजार रुपये जप्त केले.याप्रकरणी वाठोडा (नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई एसीबीच पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंद यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवशंकर खेडेकर व उज्ज्वला मडावी महेश शेलोकर,पंकज अवचट,प्रफुल् बागडे, सचिन किनेकर,प्रिया नेवान यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

