- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय दिनांक- १६ मार्च २०२४ अन्वये ‘राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना’ शासनाने लागू केली असून जिल्ह्यातील पात्र साहित्यीक व कलावंत यांनी विहीत नमूना परिशिष्ट-१ मध्ये आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव विहित अटींची पुर्तता करुन गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांचे मार्फतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.),जिल्हा परिषद गडचिरोली या विभागात दिनांक-२३ ॲगस्ट २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
योजनेच्या पात्रतेसाठी अटी👇
महाराष्ट्र राज्याचा रहीवासी,केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासीक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले पात्र कलाकार,वय ५० पेक्षा जास्त असावे,दिव्यांग कलाकारासाठी वयोमर्यादा ४० वर्ष आहे.कला व साहित्यीक क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्ष आवश्यक.वयाने जेष्ठ असणारे विधवा,परितक्त्या,दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील.कलाकाराचे सर्व मार्गाने कुटूंबाचे वार्षिक उत्तपन्न रुपये ६० हजार पेक्षा जास्त नसावे व सद्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नसावे.अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या कलावंतांनी योजनेसाठी अर्ज करावे; असे रविंद्र कणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं.जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.
- Advertisement -

