Thursday, July 30, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा अंतर्गत रक्षाबंधनपर कार्यक्रम...

कोंढाळा येथे सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा अंतर्गत रक्षाबंधनपर कार्यक्रम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज) :-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे सामूहिक वनहक्क प्राप्त क्षेत्र २५३.२५ हे.आर.मधील पटाची दान या ठिकाणी सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा अंतर्गत वनांचे संरक्षण, संवर्धन व संगोपन करण्यासाठी आणि तयार केलेल्या व्यवस्थापन आराखड्यास प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आज,सोमवार दिनांक-१९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रक्षाबंधनपर कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमास देसाईगंज तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मुनेश्र्वर गेडाम,सृष्टी संस्था (येरंडी, ता.कुरखेडा)चे संयोजक तथा मार्गदर्शक केशव गुरूनुले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. गावातील पटाची दान येथे सामूहिक वनहक्क दाव्यांच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार, वनउपज संपत्तीचे जतन,नियोजन आराखड्याच्या माध्यमातून भविष्यातील तरतूद अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करून रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून वृक्षांना गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आले.वृक्षांना राखी बांधण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे,ज्या प्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी आपली बहीण भावाला ओवाळणी घालून रक्षारुपी धागा बांधून रक्षणासाठी मागणी करते; तशाच प्रकारे आपणही सर्वजण मिळून वृक्षांची रक्षा करून वचनबध्द होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे कार्यक्रम प्रसंगी लक्षात येते.
आयोजित कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,देसाईगंज तहसीलचे नायब तहसीलदार मुनेश्र्वर गेडाम,सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरूनुले,देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,सृष्टी संस्थेचे राकेश खेवले,सामूहिक वनहक्क समितीचे अध्यक्ष प्रीतम रायशीडाम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी,सामूहिक वनहक्क समितीचे सदस्य कुलदीप मेश्राम,रजनी भजनकर,रोहिणी ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य प्रफुल मेश्राम,ग्रामरोजगार सेवक प्रकाश बेदरे,वैष्णवी वांढरे,दिव्या बुराडे,किरण पारधी,किरण चंद्रवंशी,ग्रामपंचायत कर्मचारी अजय भर्रे,प्रवीणकुमार शेंडे,बुराडे आजी,चंद्रकला दुपारे आदी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!